हाफ पँट, जाळीदार जॅकेट अन्...; सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:05 IST2025-01-07T10:50:33+5:302025-01-07T11:05:40+5:30

काळ्या रंगाची जाळीदार पँट आणि जॅकेट सईने परिधान केलं आहे. फोटोसाठी सईने खास पोझही दिल्या आहेत.

सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच तिने बॉलिवूडही गाजवलं आहे.

अभिनयाबरोबरच सई तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. तिचे हटके अंदाजातील फोटोही व्हायरल होत असतात.

सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतंच सईने स्टनिंग अंदाजात फोटोशूट केलं आहे.

काळ्या रंगाची जाळीदार पँट आणि जॅकेट सईने परिधान केलं आहे. फोटोसाठी सईने खास पोझही दिल्या आहेत.

हे फोटो शेअर करत सईने "Darkly, delicately" असं म्हटलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

एकाने "हाफ पँटवर जाळी चढवल्यासारखे वाटत आहे...", अशी कमेंट केली आहे. तर अनेकांना तिचं हे फोटोशूट पसंत पडलं आहे.

सईने सिनेमांबरोबरच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'अग्नी'मध्ये ती दिसली होती.

'द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.