नवरा ऑस्ट्रेलियात तर पूजा कोकणात, अशी साजरी केली पहिली वटपौर्णिमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 03:06 PM2024-06-21T15:06:15+5:302024-06-21T15:23:23+5:30

नवऱ्यानेही पूजासाठी खास पोस्ट शेअर करत तिची आठवण काढली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) तिच्या सौंदर्याने सर्वांना प्रेमात पाडलंच आहे. काही महिन्यांपूर्वी पूजा लग्नबंधनात अडकली. चव्हाण कुटुंबाची ती सून झाली.

आज वटपौर्णिमेनिमित्त सगळ्या सावित्री नवऱ्याच्या दीर्घायुष्येसाठी प्रार्थना करत आहेत. तसंच जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत आहेत.

पूजा सावंतनेही पहिल्या वटपौर्णिमेचे फोटो शेअर केले आहेत. पूजाचं सौंदर्य खरोखर प्रेमातच पाडणारं आहे. वटपौर्णिमेसाठी ती पारंपरिक लूक करत तयार झाली आहे.

लाल पिवळी साडी, गळ्यात मंगळसूत्र, नथ, हातात हिरव्या बांगड्या असा तिचा सुंदर लूक बघायला मिळतोय. त्यात तिच्या दिलखुलास हास्याने सौंदर्यात भर पाडली आहे.

वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतानाचा फोटोही तिने शेअर केला आहे. ती सध्या कोकणात असून निसर्गरम्य वातावरणात तिने वटपौर्णिमा साजरी केली आहे.

पहिली वटपौर्णिमा असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय. मात्र आजच्या खास दिवशी पूजासोबत तिचा नवरा नाहीए. तो ऑस्ट्रेलियात आहे. 'आज तुझी खूप जास्त आठवण येतेय' असंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

सिद्धेशनेही पूजासोबतचे फोटो शेअर करत तिची आठवण काढली आहे. आज खास दिवशी तू सोबत नाहीस हे जाणवत आहे. तुला खूप खूप प्रेम असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे.

पूजा आणि सिद्धेश फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले. मुंबईतच त्यांचं थाटात लग्न झालं. नंतर पूजा सिद्धेशसोबत ऑस्ट्रेलियाला गेली. गेल्या महिन्यातच ती भारतात आली आहे आणि सध्या कोकणातील गावात राहण्याचा आनंद घेत आहे.