प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं फोटोशूट, आई निरागस अन् मुलगी ग्लॅमरस; ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:25 IST2026-03-05T13:29:24+5:302026-03-05T14:25:08+5:30
मराठीतील आणखी एक स्टारकिड, अभिनयात पदार्पण करणार?

बॉलिवूडप्रमाणेच आता मराठी मनोरंजनविश्वातही स्टारकिड्स लक्ष वेधून घेत आहेत. अभिनय बेर्डे, साजिरी जोशी, विराजस कुलकर्णी, श्रिया पिळगांवकर, सोहम बांदेकर, रुमानी खरे, शुभवी गुप्ते अशी अनेक नावं आहेत.

९० चं दशक गाजवलेल्या काही अभिनेत्रींमध्ये निशिगंधा वाड यांचं नावही घेतलं जातं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

आज त्यांची लेक ईश्वरी देऊळकरही आपल्या सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे. ईश्वरी सध्या शिक्षण घेत आहे मात्र तिच्या प्रोफेशनल फोटोशूट्समुळे ती दिसायला एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.

ब्लॅक रंगाचा वनपीस, जॅकेट, मेसी हेअर अशा लूकमध्ये ईश्वरीने हा फोटो पोस्ट केला आहे. यात तिने एकदम प्रोफेशनल मॉडेल वाटावी अशी पोज, एक्सप्रेशन्स दिले आहेत.

आई निशिगंधा वाड यांच्या सौंदर्याची आजही स्तुती होते. ईश्वरीही याबाबतीत आईवरच गेली आहे. दिसायला नाजूक अशी तिची प्रतिमा आहे

वेस्टर्न लूकच नाही तर पारंपरिक साडीतही ती कमालीची सुंदर दिसते. तिच्या या लूकवर तर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

निशिगंधा वाड यांनी १९९१ साली दीपक देऊळकर यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी त्यांनी लेकीला जन्म दिला. दोघांनी 'ईश्वरी व्हिजन'ही निर्मिती संस्थाही स्थापन केली.

ईश्वरीने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कुलमधून शिक्षण घेतलं. तिने पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केलं आहे आणि आता ती पुढील शिक्षण घेत आहे. त्यामुळे आता ती अभिनयात पदार्पण करणार की नाही यावर अद्याप कोणीही उत्तर दिलेलं नाही.

















