"मला मूल नकोय.."; लग्नाला १० वर्ष झालेल्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं
By देवेंद्र जाधव | Updated: August 1, 2025 17:05 IST2025-08-01T16:37:02+5:302025-08-01T17:05:23+5:30
एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नाला १० वर्ष उलटूनही बाळाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीचं या निर्णयामागचं कारणही सांगितलंय

अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर बदलतं. अशातच अभिनेत्रींना जेव्हा बाळ होतं त्यानंतर झालेल्या शारीरिक बदलांमुळे त्यांच्या करिअरवरही मोठा परिणाम होतो.
यामुळे मराठी इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीने आई न होण्याचा निर्णय घेतलाय. ही अभिनेत्री म्हणजे नारायणी शास्त्री. नारायणीने 'पक पक पकाक' सिनेमात काम केलेलं
नारायणी शास्त्रीच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत. पण तिने आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. नारायणीने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता
"आई होणं ही एक मोठी जबाबदारी आहे. मला याचे फायदे-तोटे माहित आहेत. जर मी बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय घेतला तर मी काम करणं बंद करेन", असं नारायणी म्हणाली
बाळाच्या जन्मामुळे नारायणीला काही काळ काम बंद करावं लागेल. काम सोडणं तिला आवडत नाही, म्हणूनच ती आणि तिच्या पतीने मिळून आई - बाबा न होण्याचा निर्णय घेतला आहे.
नारायणीचं पहिलं लग्न झालं होतं. पण काही काळानंतर तिच्या आणि पतीच्या नात्यात दुरावा आला. नारायणीने काही वर्षांपूर्वी स्टीव्हन ग्रेवरसोबत लग्न केलं
नारायणीच्या करिअरचा मान राखून स्टीव्हनने सुद्धा तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. नारायणी सध्या हिंदी मालिकाविश्व गाजवताना दिसतेय.