लग्न पूजा सावंतचं, चर्चा मात्र मृण्मयीची... मैत्रीणीच्या लग्नातला अभिनेत्रीचा मराठमोळा लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 01:19 PM2024-02-29T13:19:16+5:302024-02-29T13:25:34+5:30

मृण्मयी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

मृण्मयी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून मृण्मयीने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

शिवाय 'नटसम्राट', 'फत्तेशिकस्त', 'सुभेदार', 'चंद्रमुखी', 'भाई : व्यक्ती की वल्ली' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून मृण्मयीने प्रेक्षकांचं मनात स्थान निर्माण केलं.

मृण्मयी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील किस्से, घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

मृण्मयीच्या प्रत्येक पोस्टची तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते. नुकतेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर तिचे काही खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.

नुकतंच 'दगडी चाळ' फेम अभिनेत्री पूजा सावंतचा लग्न सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, गौरी महाजनी, प्रार्थना बेहेरे, शाल्मली, सुखदा खांडकेकर असे सिनेविश्वातील बरेच कलाकार अभिनेत्रीच्या लग्नातील प्रत्येक विधीसाठी उपस्थित होते.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे देखील या लग्न कार्यात उपस्थित होती. नाकात नथ, पिवळी पैठणी परिधान करून तिने या लग्नाला हजेरी लावली. मृण्मयीच्या या मराठमोळ्या लूकने अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.