काहे छेड छेड मोहे...! चंद्रमुखीच्या दिलखेचक अदा, अमृता खानविलकरचे फोटो एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:06 IST2024-09-05T13:02:32+5:302024-09-05T13:06:09+5:30
अमृता ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मराठीबरोबरच बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. सध्या अमृता ड्रामा ज्युनियर्स या शोमध्ये परिक्षक आहे.

मराठी सिनेसृष्टीची चंद्रमुखी म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत असते.
अमृता ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मराठीबरोबरच बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. सध्या अमृता ड्रामा ज्युनियर्स या शोमध्ये परिक्षक आहे.
या शोसाठी अमृताने खास लूक केला होता. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अमृताने लेहेंगा चोली परिधान केल्याचं दिसत आहे. मोठे कानातले, बिंदी यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.
अमृताने या फोटोंसाठी खास पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोतील अदा पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'अदा और ड्रामा' असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
अमृताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.