दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिजीत श्वेतचंद्र कोण आहे? मालिकांमध्ये केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:30 IST2026-01-06T17:25:43+5:302026-01-06T17:30:55+5:30
चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका साकारण्यापासून माघार घेतल्यानंतर नव्या चेहऱ्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर यावरुन पडदा हटवण्यात आला आहे.

दिग्पाल लांजेकरांच्या 'शिवराज अष्टक'मधील सहावं पुष्प 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज कोण साकारणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका साकारण्यापासून माघार घेतल्यानंतर नव्या चेहऱ्याला शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर यावरुन पडदा हटवण्यात आला आहे.

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र आता शिवराज अष्टकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिजीत श्वेतचंद्र हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

बाजी, शुभविवाह, बापमाणूस, आई तुळजाभवानी या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला.

तर स्टार प्रवाहवरील लक्ष्य या क्राइम सीरिजमध्ये पोलिसांची भूमिका साकारून त्याने प्रसिद्धी मिळवली.

दिग्पाल लांजेकरांच्या याआधीच्या काही सिनेमांमध्ये तो दिसला होता. सुभेदार, शिवरायांचा छावा, अभंग तुकाराम या सिनेमांत अभिजीतने काम केलं आहे.

आता 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' या सिनेमातून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिजीतचं लग्न झालं असून त्याला एक मुलगादेखील आहे.

















