मराठीतील बार्बी डॉलचा हा अंदाज पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड,See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 15:57 IST2019-06-17T15:55:24+5:302019-06-17T15:57:10+5:30

मानसी नाईक सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती फोटो शेअर करीत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

मानसीने शेअर केलेल्या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट व ब्लू डेनिम परिधान केली आहे. या फोटोसोबत तिने म्हटलं की, फॅशनमध्ये बसण्यासाठी स्वतःला बदलू नका, तुम्हाला योग्य वाटेल अशी फॅशन करा.

मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे.

'बघतोय रिक्षावाला' म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले.

ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे.

त्याचबरोबर एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील ओळख तिने करून दिली आहे.