मकरंद देशपांडेची मेहुणी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; दिसते खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:41 IST2025-01-31T14:34:46+5:302025-01-31T14:41:10+5:30

Makarand Deshpande: अभिनेता मकरंद देशपांडेच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे कुणाला माहित नाही. मकरंद देशपांडेची पत्नी एका मराठी अभिनेत्रीची बहीण आहे.

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे (Makrand Deshpande)च्या पत्नीचे नाव निवेदिता पोहणकर (Nivedita Pohankar) असून तिची बहिणदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे अदिती पोहणकर (Aditi Pohankar) आहे.

अदिती पोहणकर (Aditi Pohankar)नेदेखील मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीत काम केलंय. आश्रम या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत काम केले आहे. यात तिने पहेलवान पम्मीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

अदिती पोहणकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

अदिती पोहणकर खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

अदिती पोहणकरने तिच्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. सुरुवातीला ती देखील पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली होती.

अदिती पोहणकर पहिल्यांदा लव्ह सेक्स और धोका या हिंदी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकली.

हिंदी चित्रपटातून लोकप्रियता मिळवल्यानंतर अदितीने कुणासाठी कुणीतरी या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

त्यानंतर ती रितेश देशमुखसह 'लयभारी' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते.

या चित्रपटानंतर ट्रकभर स्वप्नं या चित्रपटात झळकली. यात मकरंद देशपांडेदेखील प्रमुख भूमिकेत होते.

आदिती पोहणकर खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड असून तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.