महेश मांजरेकरांची मानलेली लेक गाजवतेय इंडस्ट्री, सिनेमांमध्ये केलंय काम, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:04 IST2026-02-13T13:53:33+5:302026-02-13T15:04:15+5:30
महेश मांजरेकर यांची मानलेली लेकही सध्या मराठी कलाविश्व गाजवत आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

महेश मांजरेकर हे मराठी कलाविश्वात सुप्रसिद्ध दिग्दर्शक. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, देवमाणूस, नटसम्राट, काकस्पर्श हे सुपरहिट मराठी सिनेमे त्यांनी कलाविश्वाला दिले. तर वास्तव, अंतिम या काही बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.

महेश मांजरेकर यांची मानलेली लेकही सध्या मराठी कलाविश्व गाजवत आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गौरी इंगवले आहे. गौरी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

गौरी ही महेश आणि मेधा मांजरेकर यांनी मानस कन्या आहे. ती मुळची साताऱ्याची आहे. महेश आणि मेधा मांजरेकरांनी तिला टॅलेंट ओळखून मुंबईत आणलं.

गौरीला नृत्याची प्रचंड आवड आहे. ती नृत्यविशारद आहे. काही सिनेमांमध्ये गौरीचा डान्स पाहायला मिळाला.

गौरीने कुटुंब, दे धक्का २, ३.५६ किल्लारी, काकस्पर्श या सिनेमांमध्ये काम केलं आहे. पांघरुण या सिनेमात ती मुख्य भूमिका साकारताना दिसली.

त्यानंतर ही अनोखी गाठ या सिनेमातही गौरीने साकारलेली भूमिका सगळ्यांना आवडली होती.

गौरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.

सौंदर्याच्या बाबतीत ती अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. अनेकदा गौरी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

गौरीने तिच्या खऱ्या आईवडिलांबद्दलही सांगितलं होतं. तिला एक सख्खी बहिणही आहे. तर महेश मांजरेकरांच्या सई आणि सत्या या मुलांसोबतही तिचं चांगलं बॉण्डिंग आहे.

















