सारा अन् आलियाला मागे टाकतीये 'ही' मराठमोळी स्टारकिड; वडील आहेत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 18:09 IST2023-05-08T18:03:56+5:302023-05-08T18:09:02+5:30

Aayushi jadhav: आयुषी तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्टारकिड्स सातत्याने चर्चेत येत आहेत. यात खासकरुन बॉलिवूड कलाकारांची मुलं चर्चेत येतात. मात्र, यावेळी एका मराठमोळ्या कलाकाराची लेक चर्चेत येत आहे.

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव साऱ्यांनाच ठावूक आहेत.

आजवरच्या कारकिर्दीत उमेश जाधव यांनी अनेक सिनेमांसाठी काम केलं.

दुनियादारी, झपाटलेला, सावरखेड एक गाव, प्यार वाली लव स्टोरी अशा बऱ्याच मराठी सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सरफरोश, सिलसिला है प्यार का, ट्रॅफिक सिग्नल, टोटल सियप्पा या काही हिंदी सिनेमांसाठी देखील त्यांनी कामे केली आहेत.

सध्या उमेश जाधव यांचीच लेक चर्चेत येत आहे. त्यांची लेक कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

उमेश जाधव यांच्या लेकीचं नाव आयुषी जाधव असं असून ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह आहे.

आयुषीला फोटोशूट करण्याची विशेष आवड आहे. त्यामुळे ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

आयुषीचे फोटो पाहून अनेक जण तिला सिनेसृष्टीत नशीब कधी आजमावणार असा प्रश्न विचारतात.

आयुषीला भटकंती करायचीही आवड आहे.

आयुषी कायम नवनवीन ठिकाणांना भेट देत असते.