मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे कलाकार दरवर्षी घरातच घडवतात बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 03:38 PM2023-09-18T15:38:53+5:302023-09-18T15:42:53+5:30

सगळीकडे गणेशोत्सवानिमित्ताने आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. यातच बाप्पाला घरी आणण्याची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. काहींनी बाप्पाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्त्या आणल्यात तर काहींनी घरातच इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती घडवली आहे. यात फक्त सामान्य लोकांचीच नाही तर कलाकार मंडळींचाही समावेश आहे.

अभिनेता भूषण प्रधानच्या घरीही इको-फ्रेंडली बाप्पा विराजमान होता. भूषणची आई गेल्या काही वर्षांपासून घरातच बाप्पाची शाडूच्या मातीची मूर्ती तयार करते. यावर्षीही भूषणच्या आईने बाप्पाची सुंदर मूर्ती घडवली आहे.

भूषणच्या आईकडून प्रेरणा घेऊन अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने देखील यावर्षी घरातच बाप्पाची मूर्ती घडवली आहे.

प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक रवी जाधव हे गेल्या १८ वर्षांपासून घरातच बाप्पाची मूर्ती तयार करून तिला रंगकाम करून तिची प्रतिष्ठापन करतात. इतकेच नाही तर इको-फ्रेंडली सजावट करतात.

कवी संदीप खरेंनीदेखील घरात बाप्पाची मातीची मूर्ती तयार करतात.

अभिनेता राकेश बापटला अभिनयासह कलाकुसरचीही आवड आहे. दरवर्षी तो स्वत: घरातच बाप्पाची मूर्ती घडवतो. त्याने आतापर्यंत बाप्पाच्या विविध सुंदर मूर्ती तयार केल्या आहेत. यावर्षीही त्याने सुंदर मूर्ती घडवली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या ५ वर्षांपासून बाप्पाची मूर्ती बनवत आहेत. पहिल्या वर्षी तिने अगदी साधी मूर्ती घडवली, दुसऱ्या वर्षी बालगणेशा, तिसऱ्या वर्षी शंकराच्या रुपातील बाप्पा, चौथ्या वर्षी पुन्हा बालगणेशा. यंदा संत तुकाराम महाराजांच्या रुपातला बाप्पा बनवला आहे.