दिग्दर्शक संजय जाधव यांची टॅलेंटेड लेक, बोल्डनेस पाहून व्हाल अवाक; नक्की काय करते?
By देवेंद्र जाधव | Updated: July 18, 2025 17:59 IST2025-07-18T17:23:39+5:302025-07-18T17:59:31+5:30
दिग्दर्शक संजय जाधव यांची लेक दिसायला बोल्ड असून ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. मराठी इंडस्ट्रीतही संजय जाधव यांच्या लेकीची चर्चा होताना दिसते

'दुनियादारी' आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'येरे येरे पैसा ३'चे दिग्दर्शक संजय जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. संजय जाधव यांची लेकही प्रसिद्ध कलाकार आहे
संजय जाधव यांच्या लेकीचं नाव आहे ध्रिती. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेऊन ध्रिती दिग्दर्शनात काम करत नसली तरी ती एक प्रसिद्ध डान्सर आहे. डान्सिंग सिंबा नावाने ध्रितीला सोशल मीडियावर ओळखलं जातं.
ध्रितीचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ध्रितीच्या या व्हिडीओवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात
ध्रिती पेशाने सोशल मीडियावर मॅनेजरही आहे. ती विविध ब्रँड आणि रेस्टॉरंटसाठी सोशल मीडिया सांभाळताना दिसते. याशिवाय नील सालेकर, मनमीत पेम हे कलाकार ध्रितीचे चांगले मित्र आहेत.
ध्रितीचे सोशल मीडियावर अनेक हॉट आणि बोल्ड फोटो पाहायला मिळतात. ध्रितीच्या या फोटोंवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.
ध्रितीच्या करिअरमध्ये तिचे वडील अर्थात संजय जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. ध्रितीच्या आवडीनिवडींना वाव मिळावा आणि तिला हवं ते करता यावं यासाठी संजय यांनी तिला खूप सपोर्ट केला आहे.
अशाप्रकारे ध्रिती आणि संजय ही मायलेकीची जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. संजय जाधव यांचा नुकताच रिलीज झालेला 'येरे येरे पैसा ३' सिनेमा कसा चालणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.