'दुनियादारी'चे मेंबर मराठीत घेतात सर्वाधिक मानधन; चॉकलेट बॉय अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:35 PM2023-04-12T12:35:12+5:302023-04-12T19:52:02+5:30

कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं इथंपासून ते एका सिनेमासाठी किती मानधन घेतात इथंपर्यंत सगळं. आज आम्ही तुम्हाला मराठीतील सगळ्यात मालामाल कलाकार कोण आहे ते सांगणार आहोत.

मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी हा रिपोर्टनुसार एका सिनेमासाठी जवळपास ५० लाख रुपये चार्ज करतो अशी माहिती आहे. उत्तम अभिनयासोबत स्वप्निल जोशीचे फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मराठी इंडस्ट्रीतील चंद्रमुखी अर्थात अमृता खानविलकर. अमृताला अभिनयासोबतच नृत्याची देखील आवड आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अमृता एका सिनेमासाठी १० ते १२ लाख घेते. (फोटो इन्स्टाग्राम)

मराठीतील बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सई २० लाख रुपये घेते एका सिनेमासाठी. (फोटो इन्स्टाग्राम)

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. उर्मिला अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना ही आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. ती एका चित्रपटासाठी ८ लाख रुपये घेते. (फोटो इन्स्टाग्राम)

महाराष्ट्राची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीला आपण कसं विसरु शकतो. सतत चर्चेत राहणाऱ्या सोनालीचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. सोनाली एका सिनेमासाठी १२ ते १५ लाख रुपये घेत असल्याचं कळतं. (फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. अंकुश २० ते २५ लाख रुपये एका सिनेमासाठी घेतो. (फोटो इन्स्टाग्राम)