उगवली शुक्राची चांदणी...! 'दे धक्का'मधली सायली कुठे आहे? आता कशी दिसते बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:38 IST2025-11-24T13:18:36+5:302025-11-24T13:38:16+5:30

उत्तम नृत्यांगना, बालकलाकार म्हणून केलं काम; आता सुंदर दिसते गौरी

२००८ साली आलेला 'दे धक्का' सिनेमा आजही सर्वांच्या लक्षात आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना खूप हसवलं. मकरंद अनासपुरेंचं चौकोनी कुटुंब, त्यातल्या गंमती जमती, सिद्धार्थ जाधवची कॉमेडी सगळंच भन्नाट होतं.

सिनेमात सायली आणि किसना हे बालकलाकार होते. अभिनेत्री गौरी वैद्यने सायलीची भूमिका साकारली होती. सिनेमात ती नृत्य कलेत हुशार असलेली मुलगी होती. तिचं 'उगवली शुक्राची चांदणी' गाणं खूप गाजलं.

मकरंद अनासपरेंच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेला सक्षम कुलकर्णी तर आजही सिनेमांमध्ये अॅक्टीव्ह आहे. तर सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी वैद्य आज कुठे आहे आणि कशी दिसते?

गौरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून तिला आता ओळखणंही कठीण झालंय. गौरी गेल्या अनेक वर्षात बरीच बदलली आहे

गौरीने माटुंग्यातील रुपारेल कॉलेजमधून इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतलं. गौरीने करिअरच्या शिखरावर असताना अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला.

गौरी अभिनयापासून दूर असली तरी ती अजून डान्स करिअर करते. तिची नृत्याची आवड आजही तशीच आहे आणि यातच तिने स्वत:ला व्यग्र केलं आहे.