'दे धक्का'मधली 'सायली' आठवतेय? अभिनयापासून दूर राहून आता करते हे काम

By देवेंद्र जाधव | Updated: August 5, 2025 18:40 IST2025-08-05T18:02:47+5:302025-08-05T18:40:00+5:30

'दे धक्का' सिनेमा खूप गाजला. या सिनेमातील अभिनेत्रीने फार कमी वयात इंडस्ट्री सोडली. सध्या ती काय करते?

'दे धक्का' सिनेमा खूप गाजला. या सिनेमातील किसन्या आणि सायली या बहीण-भावाची जोडी चांगलीच गाजली. सायलीची भूमिका साकारली अभिनेत्री गौरी वैद्यने

गौरी वैद्यने 'दे धक्का', 'शिक्षणाच्या आयचा घो' अशा मराठी सिनेमांमधून काम केलं. गौरीच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. 'उगवली शुक्राची चांदणी' फेम गौरी सध्या मात्र अभिनय क्षेत्रापासून दूर आहे

गौरीने माटुंग्यातील रुपारेल कॉलेजमधून इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतलं. गौरीने करिअरच्या शिखरावर असताना अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला

गौरी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनय क्षेत्रापासून दूर गेली, अशी चर्चा होती. गौरीने याविषयी कधीही अधिकृतपणे सांगितलं नाही.

गौरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून तिला आता ओळखणंही कठीण झालंय. गौरी गेल्या अनेक वर्षात बरीच बदलली आहे

गौरी अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती डान्स विसरली नाहीये. गौरी सोशल मीडियावर तिच्या डान्सचे विविध व्हिडीओ शेअर करताना दिसते.

गौरीच्या डान्स व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळत असते. गौरी सध्या तिचं डान्स आणि करिअर यावर लक्ष केंद्रीत करत आहे

करिअरच्या शिखरावर असूनही गौरीच्या डोक्यात कधीही लोकप्रियतेची हवा गेली नाही. त्यामुळेच ती आजही सर्वांची लाडकी आहे