Children's Day Special : मराठीतील या सुपरस्टार्सचे आहेत हे बालपणीचे फोटो! ओळखा पाहू कोण आहेत ते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:21 IST2025-11-14T17:04:22+5:302025-11-14T17:21:06+5:30
बालपणी असे दिसायचे मराठी सिनेसृष्टीतील तुमचे आवडते कलाकार!

ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून तुमची लाडकी तेजश्री प्रधान आहे. सध्या ती वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करताना दिसते आहे.

या गोड चिमुकलीला ओळखलंत का? अप्सरा आली म्हणत सर्वांची लक्ष वेधणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे.

या चिमुकलीने स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर मराठीसह हिंदी आणि साउथमध्ये काम केलंय. ही अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

या चिमुरड्याला ओळखलंत का? मुरांबा मालिकेतला अक्षय म्हणजेच तुमचा लाडका शशांक केतकर आहे,

फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का? हा दुसरा तिसरा कुणी नसून तुमचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव आहे.

या चिमुरडीला ओळखलंत का? हा तेजस्विनी पंडितचा बालपणीचा फोटो आहे.

या चिमुकलीला तर नक्कीच ओळखलं असेल तुम्ही. ही आहे मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर.

हा फोटो आहे मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा.

गोड हसणाऱ्या मुलीला ओळखलंत ना. ही आहे मनवा नाईक.

केसात गजरा माळून छान पोझ देणारी ही चिमुकली म्हणजे ईशा केसकर.

फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का? हा आहे अमेय वाघ.

















