बोल्ड सई ताम्हणकरचं साडीत खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल अतिसुंदर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 07:00 IST2020-08-25T07:00:00+5:302020-08-25T07:00:00+5:30
सईने साडीमध्ये फोटोशूट करुन तिच्या फॅन्सना घायाळ केले आहे

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.
सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.
सईचे नुकतेच साडीतील फोटोशूट समोर आले आहेत. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.
तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा धुरळा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
याशिवाय ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
मराठीतल्या 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.
या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे.
लक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुपी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दुसरा हिंदी सिनेमा आहे.