अमृता खानविलकर तिरूपती बालाजीच्या चरणी, दर्शनानंतरचा अनुभव शेअर करत म्हणाली "आयुष्याला दिशा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:28 IST2026-03-06T12:15:16+5:302026-03-06T12:28:33+5:30

अमृता खानविलकरची तिरुपती दर्शनानंतर भावुक पोस्ट, शेअर केले सुंदर फोटो

मराठी सिनेसृष्टीची 'चंद्रमुखी' अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतंच तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे.

आयुष्यात काही क्षण अनपेक्षितपणे येतात आणि मनाला शांतता देऊन जातात, असाच काहीसा अनुभव अमृताने या यात्रेदरम्यान घेतला.

या दर्शनानंतर अमृताने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. काही खास फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अमृताने आपल्या मनातील भावना व्यक्त करताना लिहलं, "काही क्षण असे असतात की ते क्षणिक वाटले तरी आयुष्याला वेगळी दिशा देणारे ठरतात… काही दिवसांपूर्वी जर मी स्वतःलाच सांगितलं असतं की मी भगवान वेंकटेश्वरांच्या समोर उभी राहीन, तर कदाचित मला स्वतःलाच त्यावर विश्वास बसला नसता… पण काल मी तिथे प्रत्यक्ष उभी होते".

अमृता खानविलकर आईसह तिरुपतीला पोहोचली होती. अमृताने या प्रवासाला 'देवाचं बोलावणं' म्हटलं आहे. तिने पुढे लिहिलं की, "फक्त एक साधा विचार आणि देवाला भेटण्याची मनापासूनची इच्छा यामुळे हा प्रवास सुकर झाला".

पुढे तिनं लिहलं, "नक्कीच असं वाटतं की हे त्यांचंच बोलावणं होतं. कधी कधी जेव्हा 'त्यांची' इच्छा असते, तेव्हा आपण फक्त त्यांच्यामागे चालत राहायचं असतं. 'गोविंदा गोविंदा'", अशा शब्दांत तिने श्रद्धा व्यक्त केली.

यावेळी अमृताने या प्रवासात मदत करणाऱ्या अमर आणि वसु यांच्यासह मार्गदर्शन करणाऱ्यासाठी ओम राऊत यांचेही आभार मानले.

अमृता नुकतंच 'तस्करी' या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली. या सीरिजमध्ये अमृताने एका महिला कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

'तस्करी'मध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी मुख्य भूमिकेत असून अमृताने या सीरिजमध्ये त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित करण्यात आली.

अमृता सध्या 'लग्न पंचमी' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकातील तिची भूमिका लक्षवेधी असून अभिनेता स्वप्नील जोशीही मुख्य भूमिकेत आहे.