Alka Kubal: दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक पायलट तर दुसरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:51 IST2025-06-19T12:40:56+5:302025-06-19T12:51:21+5:30

पाहा अभिनेत्रीचे फॅमिली फोटो, लाडक्या लेकींवर खिळल्या नजरा

'माहेरची साडी' सिनेमा म्हटलं की अलका कुबल (Alka Kubal) डोळ्यासमोर येतात. या सिनेमाने त्यांना ओळख दिली. आजही अलका कुबल इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्या'वजनदार' या नाटकाचे प्रयोग करत आहेत.

अलका कुबल यांनी १९९२ साली सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. समीर आठल्ये यांनी हिंदी, मराठी सिनेमांसाठी काम केलं आहे. दोघंही याच क्षेत्रात कार्यरत आहेत.

अलका कुबल आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत. ईशानी आणि कस्तुरी अशी त्यांची नावं आहेत. आईवडील सिनेइंडस्ट्रीत असताना दोन्ही लेकींनी मात्र करिअरची वेगळी वाट धरली.

ईशानी आठल्ये ही त्यांची मोठी लेक आहे. ईशानी पायलट आहे. २०१५ मध्येच तिला वैमानिकाचं लाईफटाईम लायसन्स मिळालं.

ईशानीने दिल्लीच्या निशांत वालियासोबत २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघंही परदेशातच वास्तव्यास आहेत.

अलका यांनी ईशानी पायलट असलेल्या विमानात प्रवास करतानाचाही फोटो काही महिन्यांपूर्वी शेअर केला होता. या फोटोला बरेच लाईक्स मिळाले होते. एका आईसाठी नक्कीच ही गौरवाची बाब होती.

अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी डॉक्टर आहे. तिने परदेशातून डर्मॅटॉलॉजिस्टचं शिक्षण घेतलं. कस्तुरी २६ वर्षांची आहे.

अलका कुबल सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कुटुंबासोबतचे फोटो त्या शेअर करत असतात. त्यांच्या दोन्ही लेकींचे अकाऊंट मात्र प्रायव्हेट आहेत. त्यामुळेच त्या दोघीही फारशा लाईमलाईटमध्ये येत नाहीत.