अभिनेत्री सायली संजीवला हवाय असा जोडीदार, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:15 AM2023-11-22T11:15:10+5:302023-11-22T11:18:49+5:30

Sayali Sanjeev : अभिनेत्री सायली संजीव हिने छोट्या पडद्यावरुन कलाविश्वात पदार्पण केले. काहे दिया परदेस मालिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने बऱ्याच सिनेमात काम केले. लवकरच ती झिम्मा २ चित्रपटात झळकणार आहे.

अभिनेत्री सायली संजीव हिने छोट्या पडद्यावरुन कलाविश्वात पदार्पण केले. काहे दिया परदेस मालिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने बऱ्याच सिनेमात काम केले. लवकरच ती झिम्मा २ चित्रपटात झळकणार आहे.

सध्या सायली संजीव झिम्मा २ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसते आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, क्षिती जोग हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

नुकतेच सायली संजीवनेही एका मुलाखतीतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सायली संजीव ही तिच्या वडिलांच्या खूपच क्लोज होती. वडिलांच्या निधनाने खचलेल्या सायलीने आपला जोडीदार सुद्धा वडीलांसारखाच प्रेम करणारा असावा असे या मुलाखतीत म्हटले आहे.

सायली म्हणते की, बॉयफ्रेंड आणि नवऱ्यामध्ये आपण आपल्या वडिलांना बघत असतो ही बेसिक गोष्ट आहे. कारण त्या व्यक्ती इतकं प्रेम आपण दुसऱ्या कोणावर नाही करू शकत. त्यामुळे तसंच आणि ती इमेज आपण आपल्या लाईफ पार्टनरमध्ये बघत असतो.

आपण आपल्या आयुष्यातले २०, ३० वर्ष त्या व्यक्तीबरोबर घालवलेले असतात. त्यामुळे त्याच्यावर आपण प्रेम करत असतो. आपले वडील जितकं प्रेम आपल्यावर करतात तितकं प्रेम जर नवऱ्याने केलं ना तर सर्व सॉर्टेड आहे, असे सायली म्हणाली.

याशिवाय सायली नाना पाटेकरांसोबत ओले ओले या चित्रपटात झळकणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहे.

चाहते पुन्हा एकदा सायलीला झिम्मामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.