'टाइम प्लीज' सिनेमात उमेश कामतसोबत झळकलेल्या 'या' चिमुकलीला ओळखलं का? गाजवतेय छोटा पडदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:42 IST2026-04-03T16:13:11+5:302026-04-03T16:42:43+5:30
‘टाइम प्लीज’मधील ही बालकलाकार आठवतेय? आज आहे लोकप्रिय अभिनेत्री, सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर

अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका असलेला टाइम प्लीज हा सिनेमा २०१३ साली प्रदर्शित झाला.

हा चित्रपट आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाचं तेव्हा सगळीकडे कौतुक झालं. दरम्यान, या चित्रपटामध्ये उमेश कामतसोबत झळकलेली एक बालकलाकार कदाचित तुम्हाला आठवत असेल. ही चिमुकली आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. कोण आहे ती जाणून घेऊया...

अगदी कमी वयातच तिने हे यश मिळवलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून गिरीजा प्रभू हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं.

याआधी गिरीजाने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे. गिरीजाने ‘टाइम प्लीज’ या सिनेमात चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आणि त्यासाठी तिला ३०० रुपये इतकं मानधन मिळालं होतं.

अभिनयाबरोबरच तिला नृत्याची पण आवड आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअॅलिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता. तसेच अलिकडेच ती स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत पाहायला मिळाली.

एका मुलाखतीत गिरिजाने सांगितलं होतं की, "टाइम प्लीज सिनेमात मी एका सिनमध्ये मी दिसले आहे. उमेश कामतच्या शेजारी क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमध्ये मी एकटीच मुलगी आहे. तेव्हा मला काहीही कळत नव्हतं. दिग्दर्शकांनी सांगितलं तसं मी करत होते."

गिरीजा सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

















