अभिनेता प्रतीक देशमुखने सुदेश भोसलेंच्या लेकीसोबत घेतले सातफेरे!, वेडिंग अल्बम आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:33 IST2025-11-11T14:26:37+5:302025-11-11T14:33:45+5:30

Actor Pratik Deshmukh got married to Sudesh Bhosle's daughter Shruti Bhosale : अभिनेता प्रतीक देशमुखने सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांची मुलगी श्रुती भोसले हिच्यासोबत सोमवारी, म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे.

अभिनेता प्रतीक देशमुखने सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांची मुलगी श्रुती भोसले हिच्यासोबत सोमवारी, म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे.

प्रतीक देशमुख आणि श्रुती भोसले यांचा विवाहसोहळा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.

या लग्नाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील श्रुती मराठे, तेजश्री प्रधान आणि गौरव घाटणेकर उपस्थित होते. अभिनेत्याच्या वरातीत ते नाचताना पाहायला मिळाले.

ऑक्टोबर महिन्यात घरच्यांच्या उपस्थितीत प्रतीक आणि श्रुतीचा साखरपुडा पार पडला होता. फोटो शेअर करत त्यांनी ही खूशखबर चाहत्यांना दिली होती.

अभिनेता प्रतीक देशमुखने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. यात त्याने १०, नोव्हेंबर, २०२५ असे लिहिले आहे.

लग्नात श्रुतीने लाल रंगाची साडी नेसली आहे. मिनिमल मेकअप, केसांचा आंबाडा, त्यावर गजरे, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर या गेटअपमध्ये वधू खूपच सुंदर दिसते आहे.

तर प्रतीकने बेज रंगाची हेवी वर्कची डिझाईन असलेली शेरवानी परिधान केली आहे. डोक्यावर फेटा बांधलेला अभिनेता वराच्या गेटअपमध्ये राजबिंडा दिसतो आहे.

प्रतीक देशमुखने शेअर केलेल्या या वेडिंग अल्बमला चाहत्यांची पसंती मिळत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

प्रतीक देशमुख मराठी अभिनेता आहे. त्यानेृ 'शुभ लग्न सावधान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तो लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे.