Girija oak: पुण्याची प्रसिद्ध शाळा अन् मुंबईचं कॉलेज! गिरीजा ओकचं शिक्षण माहीत आहे का? जाणून घ्या तिच्या शिक्षणाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:12 IST2025-12-26T17:06:50+5:302025-12-26T17:12:24+5:30

Girija Oak Education : मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक साडीतल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर रातोरात नॅशनल क्रश झाली.

अभिनेत्री गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे.

तिच्या लूकवर, हसण्यावर, बोलण्याच्या स्टाईलवर सगळेच भाळले आहेत. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते.

ती तिच्या साडीतल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर रातोरात नॅशनल क्रश झालीय.

गिरीजा ओकचा जन्म नागपूरचा असला तरी तिचे शिक्षण मुंबई आणि पुण्यात झालं आहे.

गिरीजा ओकने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा या शाळेतून पूर्ण केलंय.

गिरीजाने मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर गिरीजाने बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. कॉलेजमधूनच अभिनयाला सुरूवात केली.

सुरूवातीला जाहिराती आणि थिएटर वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला होता.

हिंदी जाहिरात, सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमातून गिरीजाने रसिकांच्या मनावर छाप सोडली.