विराजसच्या आधी 'या' व्यक्तीने केलं होतं शिवानीला प्रपोज; अभिनेत्रीने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 08:00 IST2023-03-24T08:00:00+5:302023-03-24T08:00:00+5:30
Shivani rangole: शिवानी आणि विराजसचं लव्ह मॅरेज असून मोठ्या थाटात त्यांनी लग्नगाठ बांधली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे.
'शेजारी शेजारी' या मालिकेतून शिवानीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने महुआ ही भूमिका साकारली होती.
शिवानीने फुंतरु आणि अँड जरा हटके या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
शिवानीने काही महिन्यांपूर्वीच अभिनेता विराजस कुलकर्णी याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
सध्या शिवानी तिच्या जुन्या आठवणींमुळे चर्चेत येत आहे. शिवानीने अलिकडेच 'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत तिच्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला.
'शाळेत असताना तुला कोणी प्रपोज केलं होतं का?' असा प्रश्न शिवानीला विचारण्यात आला होता. त्यावर तिने होकारार्थी उत्तर दिलं.
"हो. शाळेत असताना मला एका मुलाने प्रपोज केलं होतं आणि मी त्याचं नाव सांगितलं होतं", असं शिवानी म्हणाली.
थोडक्यात, विराजसच्या आधी शिवानीला शाळेतल्या एका मुलाने प्रपोज केलं
शिवानी आणि विराजसचं लव्ह मॅरेज असून मोठ्या थाटात त्यांनी लग्नगाठ बांधली.