मांजरेकरांच्या लेकीची सोशल मीडियावर हवा; सईने शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 17:11 IST2023-11-28T17:06:38+5:302023-11-28T17:11:18+5:30

Saiee manjarekar: सईने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांच्या लेकींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

एक लेक मराठी कलाविश्वात तिचं स्थान निर्माण करत आहे. तर, दुसरी बॉलिवूडमध्ये. यामध्येच 'दबंग 3' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सईचा (saiee manjrekar) चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.

सईदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अलिकडेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सईने हिरव्या रंगाच्या साडीमध्ये नुकतंच फोटोशूट केलं आहे. यातील निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सईच्या फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

सईची अर्थात अभिनेत्री मेधा मांजरेकर हिनेही लेकीच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

सई अल्पावधीत मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली आहे.