Photos: बाळाच्या स्वागतासाठी राधा सागरने घेतलं नवं घर; इंटेरिअर पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 17:26 IST2023-07-28T17:19:03+5:302023-07-28T17:26:12+5:30
Radha sagar:राधा नुकतीच तिच्या नवीन घरी राहायला गेली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने ही माहिती दिली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राधा सागर. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली राधा अलिकडेच 'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकली होती.
आई कुठे काय करते या मालिकेत सुरुवातीला तिने अभिषेकच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. परंतु, त्यानंतर तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला आहे.
राधा लवकरच आई होणार आहे. त्यामुळे काही काळासाठी तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला आहे.
अलिकडेच राधाचं दणक्यात डोहाळेजेवण पार पडलं. यावेळी राधाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसून येत होता.
बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर राधाने पुन्हा एक नवीन गुडन्यूज दिली आहे.
राधा नुकतीच तिच्या नवीन घरी राहायला गेली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने ही माहिती दिली.
राधाने पुण्यात तिचं स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. हे घर सजवताना तिने प्रत्येक लहानातील लहान गोष्टीचा विचार केला आहे.
राधाने इन्स्टाग्रामवर होम टूरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या घराची छानशी झलक पाहायला मिळते.
राधाने घरातील प्रत्येक कोपरा अत्यंत विचारपूर्वक सजवला आहे. घराच्या भिंतीसाठीदेखील सुंदर रंगसंगती निवडली आहे.
या घऱात तिने अनेक शो पिस ठेवले आहेत. ज्यामुळे घराच्या सौंदर्यात भर पडत आहे.
राधाने तिचं किचनदेखील आधुनिक पद्धतीने सजवलं आहे.