Ufff !! माझा ऑक्सिजन, माझी प्राजू..., प्राजक्ताचे फोटो पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:59 IST2022-08-18T17:53:06+5:302022-08-18T17:59:36+5:30
Prajakta Mali : गुलाबी साडीतील प्राजक्ताच्या या फोटोंवरून नजर हटवणं कठीण आहे. ती कमालीची सुंदर दिसतेय. चाहते तर अगदी घायाळ झाले आहेत.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. आता पुन्हा एकदा प्राजक्ताने काही किलर फोटो शेअर केले आहेत.
होय, नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्स पाऊस पडला, चाहते अक्षरश: तिच्या या फोटोंवर फिदा झालेत.
गुलाबी साडीतील तिच्या या फोटोंवरून नजर हटवणं कठीण आहे. ती कमालीची सुंदर दिसतेय. चाहते तर अगदी घायाळ झाले आहेत.
तिच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साहजिकच तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत.
छान हा प्राजक्ता, तू पण, पोझ पण अन् साडी पण... असं एका चाहत्याने म्हटलं आहे. एकाने तर माझी प्राजू म्हणत खूप सारे हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
अलीकडेच प्राजक्ता माळीची ‘रानबाजार’ ही सीरिज विशेष गाजली होती. यातील प्राजक्ताच्या कामाचं अपार कौतुक झालं.
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता टीव्हीवरून गायब होती. पण आता ती परतली आहे. होय, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सीझन सुरू झाला आहे.