पाठमोरी उभी असलेल्या 'बिग बॉस'फेम 'या' अभिनेत्रीला ओळखून दाखवा; बोल्ड फोटोंमुळे येतीये चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 18:43 IST2023-10-16T18:34:49+5:302023-10-16T18:43:20+5:30
Marathi actress: या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
उत्तम अभिनयासह मेघा तिच्या ठसकेबाज लावणीमुळेही कायम प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
मेघा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या भेटीला नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
मेघाने यावेळी नवरात्री निमित्त खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटपैकी काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मेघाचे हे फोटो व्हायरल होत असून तिच्या ग्लॅमरस लूकची चर्चा होत आहे.
मेघाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. सोबतच त्याला साजेसा मेकअप केला आहे.
मेघाच्या या फोटोंवर कमेंटचा पाऊस पडत आहे.
मेघाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहेत.