अश्विनी कासारने लावला हॉटनेसचा तडका; सोशल मीडियावर होतीये बोल्डनेसची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:40 IST2023-03-13T18:36:49+5:302023-03-13T18:40:15+5:30
Ashwini kasar:अश्विनी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आणि लेखिकादेखील आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार. कलाविश्वाप्रमाणेच अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अश्विनी कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या अश्विनीने अलिकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
अश्विनीने केलेल्या फोटोशूटमध्ये ती कमालीची बोल्ड आणि बिंधास्त दिसत आहे.
अश्विनीने २०१४ मध्ये कमला या मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.
अश्विनी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आणि लेखिकादेखील आहे.
अश्विनीने सोयरे सकळ या नाटकातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
एक होती माळीण या चित्रपटातही ती झळकली होती.