'राजा हिंदुस्तानी'मधील कम्मो आठवतीये का?लोकप्रिय ठरलेल्या या अभिनेत्रीला आता ओळखणंही आहे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:09 IST2022-02-23T12:03:15+5:302022-02-23T12:09:20+5:30

Raja hindustani: नवनीत यांनी 'वारिस', 'जान तेरे नाम', 'अकेले हम अकेले तुम', 'अचानक', 'प्यार कोई खेल नहीं', 'मेला', 'आपको पहले भी कहीं देखा है', 'रात गई बात गई' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

१९९६ मध्ये प्रदर्शित झालेला राजा हिंदुस्तानी हा चित्रपट प्रत्येकाच्याच लक्षात असेल. या चित्रपटातील संवाद आणि कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

अभिनेता आमिर खान आणि करिश्मा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील अन्य कलाकारही तुफान लोकप्रिय झाले होते.

या चित्रपटात करिश्माचे केअर टेकर गुलाब सिंह आणि कम्मो या दोघांनीही त्यांच्या विनोदशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळेच आज या चित्रपटातील कम्मो सध्या काय करते ते जाणून घेऊयात.

या चित्रपटात कम्मो म्हणजेच कमल सिंह ही भूमिका अभिनेत्री नवनीत निशान यांनी साकारली होती.

या चित्रपटात मुलांच्या वेशात वावरणारी कम्मो खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. इतंकच नाही तर या काही वर्षांमध्ये तिच्यात कमालीचा बदल झाला आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेली नवनीत सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. त्यामुळे त्यांचे फोटो फार क्वचित प्रसंगी प्रेक्षकांना पाहायला मिळतात.

नवनीत यांच्या प्रचंड बदल झाला असून त्या पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसू लागल्या आहेत.

नवनीत यांनी 'वारिस', 'जान तेरे नाम', 'अकेले हम अकेले तुम', 'अचानक', 'प्यार कोई खेल नहीं', 'मेला', 'आपको पहले भी कहीं देखा है', 'रात गई बात गई' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.