बाबो..! बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी हॉलिवूड अभिनेत्रीला मिळालं ५३० कोटींचं मानधन, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:03 IST2025-09-18T13:00:51+5:302025-09-18T13:03:48+5:30

हॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या ग्लॅमर विश्वातील एक चर्चेचा विषय बनली आहे. यामागचं कारण तिचं मानधन आहे, ज्याबद्दल ऐकून प्रत्येकजण चकित झाला आहे.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सिडनी स्वीनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे आणि तेही सर्वात महागड्या चित्रपटातून. यामागचं कारण तिचं मानधन आहे, ज्याबद्दल ऐकून प्रत्येकजण चकित झाला आहे.

अशी चर्चा आहे की, हॉलिवूडमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी सिडनी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचं मानधन, जे सध्या खूप चर्चेत आहे.

'युफोरिया', 'एनीवन बट यू' आणि 'द व्हाईट लोटस' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या सिडनी स्वीनीबद्दल अशी बातमी येत आहे की ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

तिच्या बॉलिवूड पदार्पणापेक्षा तिच्या मानधनाची चर्चा जास्त आहे. असं म्हटलं जात आहे की, तिच्या पहिल्या भारतीय चित्रपटासाठी ती ५३० कोटी रुपये मानधन घेत आहे.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, एका मोठ्या भारतीय प्रोडक्शन हाऊसने सिडनी स्वीनीला एका मेगा-बजेट चित्रपटासाठी संपर्क साधला आहे. प्रोडक्शन कंपनीने सिडनीला जवळपास ५३० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे.

या पॅकेजमध्ये कथितरित्या ३५ दशलक्ष पाउंड (जवळपास ४१५ कोटी रुपये) मानधनासह १० दशलक्ष पाउंड (जवळपास ११५ कोटी रुपये) चा स्पॉन्सरशिप करारही समाविष्ट आहे. असं म्हटलं जात आहे की, निर्माते चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता वाढवण्यासाठी तिच्या जागतिक स्टार पॉवरवर अवलंबून आहेत.

रिपोर्ट्सनुसार, मानधनाबद्दल जाणून स्वतः सिडनी स्वीनीही हैराण झाली आहे. जेव्हा तिला हा प्रस्ताव मिळाला, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली, कारण ४५ दशलक्ष पाउंड ही खूप मोठी रक्कम आहे. मात्र, यामुळे तिला जागतिक स्तरावर आणखी ओळख मिळेल. तरीही, तिने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही.

असं म्हटलं जातंय की, सिडनीसाठी पैसा महत्त्वाचा नाही. तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. अशी अपेक्षा आहे की, सिडनी कदाचित टॅलेंटमध्ये भर पडण्यासाठी भारतीय प्रोजेक्टला होकार देईल.

या प्रोजेक्टमध्ये सिडनी एका तरुण अमेरिकन स्टारची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे, जी एका भारतीय सेलिब्रिटीच्या प्रेमात पडते. याचं शूटिंग २०२६ च्या सुरुवातीला न्यूयॉर्क, पॅरिस, लंडन आणि दुबई यांसारख्या ठिकाणी होणार आहे. सध्या, हा कोणता प्रोजेक्ट आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.