'हम सोचते ही रह गये..और प्यार...', असे म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 06:00 IST2021-03-04T06:00:00+5:302021-03-04T06:00:00+5:30
प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट फोटोंची होतेय सर्वत्र चर्चा

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.
मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.
प्राजक्ता माळी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
प्राजक्ता माळीने नुकतेच पर्पल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.
प्राजक्ताने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या.
सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.