Ghoomketu Trailer: नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘घुमकेतु’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:46 IST2020-05-20T16:46:18+5:302020-05-20T16:46:18+5:30

नवाझुद्दीन सिद्दीकी व अनुराग कश्यप यांचा ‘घुमकेतु’ हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे.

‘घुमकेतु’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

‘घुमकेतु’च्या ट्रेलरमध्ये नवाझुद्दीन एका वेगळ्या रूपात पाहायला मिळतोय. त्याची कॉमेडी बघण्यासारखी आहे.

घुमकेतु अर्थात नवाज संतो बुआला आपली कथा ऐकवतो आणि इथून ट्रेलरची सुरुवात होते.

पण घुमकेतुची कथा संतोला फार आवडत नाही. यानंतर घुमकेतु कामाच्या शोधात फिरताना दिसतो.

रघुवीर यादवही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.त्याची झलक ट्रेलरमध्ये दिसते.

अनुराग कश्यप हाही एका भ्रष्ट पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसतो. तो घुमकेतुला शोधत असतो.

अशात आपल्याकडे एक यशस्वी लेखक बनण्यासाठी केवळ 30 दिवस असल्याचे घुमकेतुला कळते.

नवाजला एका विनोदी अंदाजात पाहणे इंटरेस्टिंग आहे.

एका फ्रेममध्ये अमिताभ बच्चनही ट्रेलरमध्ये दिसतात.