पीयूष बन्सलपासून अशनीर ग्रोवरपर्यंत, माहितीये किती आहे 'Shark Tank India' च्या 'शार्क्स'ची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:19 IST2022-01-26T16:13:58+5:302022-01-26T16:19:06+5:30
'Shark Tank India' हा शो सध्या प्रत्येक घरात चर्चेचा विषय बनला आहे. तसंच या 'शो'चे जजदेखील चर्चेत आले आहेत.

Shark Tank India Judges Net Worth: काही आठवड्यांपूर्वीच सुरू झालेला 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) हा टीव्ही रिअॅलिटी शो (TV Reality Show) फार कमी वेळात सर्वोत्कृष्ट टीव्ही शो पैकी एक बनला आहे. नव उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी फंडिंग करणं हा या शो चा मूळ उद्देश आहे. या शो मध्ये अनेक जण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी काही भन्नाट कल्पना घेऊन येत असतात.
शोमधील ७ जजच्या ज्युरीला 'शार्क' असं संबोधण्यात येतं. हा शो आता प्रत्येक घराघरात चर्चेचा विषय बनला आहे आणि त्याचे जज अवघ्या काही कालावधीत लोकप्रिय सेलिब्रिटी झालेत. यामुळेच नेटकरी सध्या शो चे जज आणि त्यांच्याशी संबंधित माहिती शोधण्याचा गुगलवर (Google) प्रयत्न करताना दिसतायत. तर आपण जाणून घेऊया या 'शार्क्स'ची संपत्ती आहे तरी किती.
अशनीर ग्रोवर
अशनीर ग्रोवर हे 'BharatPe' चे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक आहेत. त्यांनी यापूर्वी कंपनीचे सीईओ म्हणूनही काम केलं आहे. भारतपे ची सुरूवात करण्यापूर्वी, अश्नीर हे PCJ मध्ये न्यू बिझनेस प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी Grofers मध्ये मुख्य वित्तीय अधिकारी, अमेरिकन एक्सप्रेसमध्ये कॉर्पोरेट विकास संचालक आणि कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती ७०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
अमन गुप्ता
अमन गुप्ता हे 'boAt' कंपनीचे सीएमओ आणि सह-संस्थापक आहेत. २००३ मध्ये 'Citi' कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. KPMG मध्ये वरिष्ठ व्यवस्थापन सल्लागार आणि हरमन इंटरनॅशनलमध्ये विक्री संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. 'बोट' कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी 'अॅडव्हान्स्ड टेलिमीडिया प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'इमॅजिन मार्केटिंग इंडिया' सारख्या कंपन्यांचंही नेतृत्व केलं आहे. ते 'इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया' मध्ये D2C कौन्सिलचे संचालक देखील आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ७०० कोटी रुपये आहे.
नमिता थापर
नमिता थापर या 'Emcure Pharmaceutical' च्या कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी 'Institute of Chartered Accountants of India' मधून सीएची पदवीही घेतली आहे. त्यांनी 'ड्यूक युनिव्हर्सिटी'च्या 'Fuqua School of Business'मधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी अमेरिकन कंपनी 'Guidant Corporation' मध्ये ६ वर्षे काम केले आणि त्यानंतर 'Emcure Pharmaceutical' या कंपनीत मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यांनी 'हार्वर्ड बिझनेस स्कूल', इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM-A), ईटी महिला संमेलन, FICCI सारख्या विविध प्रतिष्ठित मंचांवर देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
पीयूष बन्सल
पीयूष बन्सल हे 'Lenskart'चे सह-संस्थापक, मुख्य कार्यकारी आणि पीपल ऑफिसर आहेत. त्यांनी McGill University मधून अभियांत्रिकी ऑनर्स केले आणि २००७ मध्ये 'मायक्रोसॉफ्ट' कंपनीत प्रोग्राम मॅनेजर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांनी 'आयआयएम बंगलोर'मधून एमबीए केलं आहे. शोमध्ये कमलेश यांच्या कल्पनेत गुंतवणूक केल्यानंतर ते 'शार्क टँक इंडिया'चे सर्वात आवडते स्टार बनले आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
अनुपम मित्तल
अनुपम मित्तल हे 'पीपल ग्रुप'चे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. ही अशी कंपनी आहे जिने 'शादी डॉट कॉम' आणि 'मकान डॉट कॉम' सारखे व्यवसाय निर्माण केले आहेत. ते 'Boston College'चे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी यूएस-आधारित सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी 'MicroStrategy'मध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांची सध्याची एकूण संपत्ती १८५ कोटी रुपये आहे.
गजल अलघ
गजल अलघ या 'MamaEarth' कंपनीच्या सह-संस्थापक आणि चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत. त्यांनी 'पंजाब युनिव्हर्सिटी'मधून बीसीए केले आहे. त्या एक आर्टिस्टदेखील आहेत. त्यांनी 'स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स' आणि 'न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ आर्ट'मधून शिक्षण घेतलंय. त्यांची एकूण संपत्ती १४८ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
विनीता सिंह
विनिता सिंह या 'Sugar Cosmetics'च्या सीईओ आहेत. त्या एक ब्युटी सबस्क्रिप्शन कंपनी 'Fab Bag' च्या सह-संस्थापक देखील आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती ५९ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.