भावाच्या लग्नात श्रद्धा कपूरला आवरले नाही तिचे अश्रू, पाहा हे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 19:45 IST2021-03-06T19:35:54+5:302021-03-06T19:45:55+5:30

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांच्या मुलगा प्रियांक आणि प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत नुकतेच लग्न झाले.
श्रद्धा कपूर तिच्या कुटुंबियांसोबत लग्नासाठी मालदिवला गेली होती.
श्रद्धा आणि तिच्या कुटुंबियांनी या लग्नात चांगलीच धमाल केली.
पण भावाला हळद लावताना श्रद्धा इमोशनल झाली असल्याचे पाहायला मिळाले
श्रद्धाचे रडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
प्रियांक हा श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा आहे.
श्रद्धा आणि तिच्या भावासोबत प्रियांकची बाँडिंग खूपच चांगली आहे.
श्रद्धाच्या सोशल मीडियावर आपल्याला प्रियांकसोबतचे फोटो पाहायला मिळतात.
श्रद्धाने या लग्नात प्रचंड एन्जॉय केले.