दिशा पाटनीनं सोशल मीडियावर भरुन काढली सगळी कसर, हॉट PHOTOS केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:34 IST2025-03-24T15:26:14+5:302025-03-24T15:34:57+5:30
आयपीएल २०२५ चा उद्घाटन समारंभात दिशावर अन्याय झाल्याचे तिचे चाहते म्हणत होते. आता अभिनेत्रीनं हे फोटो पोस्ट करत सर्व कसर भरुन काढली आहे.

मात्र, तिचा डान्स लाइव्ह टीव्हीवर फारसा दाखवण्यात आला नाही. तो बरचसा कट करण्यात आला होता. ज्यामुळे चाहते निराश झाले.
या सोहळ्यासाठी दिशानं खास लूक केला होता. याच लूकमधील हॉट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिनं चाहत्यांना खूश केलं आहे.
दिशाने आयपीएल २०२५ चा ओपनिंग समारंभासाठी आयव्हरी ब्रॅलेट आणि मॅचिंग स्कर्ट परिधान केला होता.
स्मोकी आय मेकअप, मोकळे केस अशा हॉट लूकमधील तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.
एका पेक्षा एक पोझ देत तिनं चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे.
दिशाच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पहायला मिळत आहे.
रिपोर्टनुसार दिशाने IPL २०२५ च्या ओपनिंग सेरेमनीसाठी २२ ते ५० लाखांची फी घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
दिशाच्या स्टाईलचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. वेस्टर्न असो वा देसी प्रत्येक लूकमध्ये ती भारीच दिसते.
तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे.