सोहमपेक्षाही कैकपटीने हॅण्डसम दिसतो शुभ्राचा रिअल लाइफ नवरा; 'या' क्षेत्रात करतोय करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:00 AM2022-07-13T06:00:00+5:302022-07-13T06:00:00+5:30

Uma pendharkar:सध्या सोशल मीडियावर उमाच्या नवऱ्याची चर्चा रंगली आहे. तिचा नवरा कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं.

'अगंबाई सासूबाई' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उमा ऋषिकेश.

उमा ऋषिकेश असं सोशल मीडियावर नाव लावणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव उमा पेंढारकर आहे.

या मालिकेत उमाने सोहमच्या पत्नीची म्हणजेच शुभ्राची भूमिका साकारली होती.

उत्तम अभिनयासह स्वभावातील नम्रपणामुळे उमा विशेष लोकप्रिय झाली.

अग्गंबाई सासूबाई व्यतिरिक्त उमाने काही गाजलेल्या ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर उमाच्या नवऱ्याची चर्चा रंगली आहे. तिचा नवरा कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं.

उमा पेंढारकरच्या नवऱ्याचं नाव ऋषिकेश पेंढारकर असून तो एक आर्टिटेक आहे. तसंच त्यालादेखील शास्त्रीय संगीताची आवड आहे.

ऋषिकेशला फिरण्याची प्रचंड आवड असून तो बऱ्याचदा नवनवीन ठिकाणांना भेट देत असतो.

ऋषिकेश सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय आहे.

उमाने मुंबईतील रुईया महाविद्यालयातून सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे. त्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त ती काउंसिलिंगचे कामही मोठया जबाबदारीने करते.

‘स्वामिनी’ ही उमाची पहिलीच मालिका होती. या मालिकेत तिने पार्वतीबाई ही भूमिका साकारली होती.