Lockdown :सध्या काय करतेय दीपिका पादुकोण? उत्तर हवे असेल तर पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 16:53 IST2020-04-03T16:44:54+5:302020-04-03T16:53:39+5:30
थांबता थांबेनात दीपिकाच्या खोड्या

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या लॉकडाऊनच्या काळात काय करतेय, तर नवरा रणवीर सिंगसोबत धम्माल मस्ती. दीपिकाने रणवीरचा एक फोटो शेअर केला. तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.
फोटोत रणवीर झोपलेला आहे. झोपलेल्या रणवीरच्या माथ्यावर दीपिकाने ‘हसबण्ड’ असे लिहिलेली चिठ्ठी चिपकवलीय.
दीपिकाच्या या खोड्यांना रणवीरने मजेशीर उत्तर दिले आहे.
लॉकडाऊनच्या काळात दीपिका धम्माल मस्ती करतेय.
कधी घराची स्वच्छता, तर कधी पोटपूजा असे तिचे सुरु आहे.
रणवीर व दीपिका ऐरवी प्रचंड बिझी असतात. पण लॉकडाऊनच्या निमित्ताने दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
रणवीर व दीपिका बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही ‘83’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.