"तुला ब्लाऊज काढावा लागेल आणि मी...", माधुरी दीक्षितकडे दिग्दर्शकाने केलेली विचित्र मागणी, मग घडलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:35 IST2025-10-01T12:31:08+5:302025-10-01T12:35:49+5:30

Madhuri Dixit : सिनेइंडस्ट्रीत कलाकारांकडून अनेकदा विचित्र मागण्या केल्या जातात. असाच काहीसा प्रकार माधुरी दीक्षितसोबतही घडला होता.

माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या कारकिर्दीची सुरुवात फ्लॉप चित्रपटांनी झाली. कुटुंबाच्या टोमण्यांमुळे एका क्षणासाठी तिने स्वतःच चित्रपटांपासून दूर राहण्याचा विचार केला होता. मात्र, चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर, १९८८ मध्ये आलेल्या 'तेजाब' या पहिल्या हिट चित्रपटातील 'मोहिनी' बनून ती रातोरात स्टार झाली. यानंतर तिने एकामागोमाग एक अनेक हिट चित्रपट दिले. या हिट्स दरम्यान असे काही प्रसंग आले, जेव्हा तिला विचित्र मागण्यांमुळे रडकुंडीला आली होती.

तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल माहिती आहे का, ज्यात दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे एक विचित्र मागणी केली होती? माधुरीने आधी दिग्दर्शकाची ती मागणी मान्य केली, पण जेव्हा ती करण्याची वेळ आली, तेव्हा तिने माघार घेतली. माधुरीच्या या भूमिकेनंतर दिग्दर्शकाने तिला त्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला होता.

चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार अनेकदा अभिनेत्रींना असे सीन करावे लागतात, जे करण्याची त्यांची इच्छा नसते. माधुरी दीक्षितने नेहमीच तिची सोज्वळ प्रतिमा जपली. १९८९ मध्ये असा एक चित्रपट आला, ज्यात दिग्दर्शकाने धक धक गर्लकडे ब्लाऊज काढण्याची मागणी केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती त्यासाठी आधी तयार झाली, पण जेव्हा तो सीन करण्याची वेळ आली, तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. दिग्दर्शकाने कोणाचेही ऐकले नाही आणि माधुरीला स्पष्ट सांगितले की, "एकतर सीन कर किंवा चित्रपट सोडून दे."

हा किस्सा १९८९ सालचा आहे. त्या काळात टीनू आनंद यांनी 'शनाख्त' नावाच्या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षितची निवड केली होती. टीनू आनंद यांनी माधुरीला चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला दिली, तेव्हाच या ब्लाउज काढण्याच्या सीनबद्दल सांगितले होते. मात्र, शूटिंगच्या वेळी तिने नकार दिला. रेडिओ नशासोबतच्या एका जुन्या मुलाखतीत टीनू आनंद यांनी स्वतःच हा किस्सा शेअर केला होता.

त्यांनी त्या सीनची आठवण सांगितली होती, ज्यात अमिताभ बच्चन साखळ्यांनी बांधलेले असतात. ते माधुरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, पण गुंड त्यांच्यावर हावी होतात. अशा वेळी माधुरीला मध्ये येऊन हे म्हणायचे होते की, "जंजीरों में बंधे अकेले आदमी पर क्या हमला करना, जब उनके सामने एक औरत खड़ी है.."

टीनू यांनी दावा केला होता की, त्यांनी चित्रपट साईन करण्यापूर्वीच माधुरीला हा संपूर्ण सीन समजावून सांगितला होता. ते म्हणाले होते, "मी माधुरीला सांगितले होते की, तुला पहिल्यांदा तुझा ब्लाउज काढावा लागेल. आम्ही तुला अंतर्वस्त्रामध्ये दाखवू आणि मी गवत किंवा इतर कशाच्याही मागे काहीही लपवणार नाही. कारण, तुम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाची मदत करण्यासाठी स्वतःला समर्पित करत आहात. त्यामुळे ही खूप महत्त्वाची परिस्थिती आहे आणि मला तो सीन पहिल्याच दिवशी शूट करायचा आहे." माधुरीने हा सीन करायला सहमती दर्शवली होती.

पहिल्या दिवशी जेव्हा हा सीन शूट करायचा होता, तेव्हा माधुरीने सीन करण्यास नकार दिला. "मी विचारले काय झाले?" ती म्हणाली, टीनू, मला हा सीन करायचा नाहीये. मी म्हणालो, "मला माफ कर, पण तुला हा सीन करावाच लागेल." ती म्हणाली, नाही, मला करायचा नाहीये. उत्तर ऐकल्यावर मी म्हणालो, "ठीक आहे, पॅकअप करा, चित्रपटाला रामराम कर. मी माझे शूटिंग रद्द करेन."

नंतर अमिताभ बच्चन यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "राहू दे, तू तिच्याशी वाद कशाला घालतोयस? जर तिला आक्षेप असेल..." मी म्हणालो, "जर तिला आक्षेप होता, तर तिने चित्रपट साईन करण्यापूर्वीच तसे करायला हवे होते."

अखेरीस, माधुरीचे सेक्रेटरी आले आणि टीनू यांना म्हणाले की, माधुरी हा सीन करण्यासाठी तयार आहे. मात्र, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या सीनने पडद्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी अपयशी झाला आणि सिनेमा फ्लॉप ठरला.