रॅम्प वॉक करताना गेला तोल अन्...; 'या' अभिनेत्रींची ऐनवेळी झाली फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:32 PM2022-03-14T18:32:24+5:302022-03-14T18:39:05+5:30

Bollywood actress: रॅम्प वॉक करत असताना अनेकदा अभिनेत्रींचा तोल जाऊन त्या पडल्या. मात्र, पुन्हा आत्मविश्वासाने उठून त्यांनी त्यांचा वॉक पूर्ण केला.

कंगना राणौत - आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. आत्मविश्वास आणि फॅशनसेन्स यामुळे कंगनाची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते.

बिंधास्तपणे सर्वत्र वावरणारी कंगनाला २०१४ मध्ये लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये रॅम्प वॉक करताना पडली होती.

पूनम ढिल्लन - ८० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूनम ढिल्लन. आपल्या कारकिर्दीमध्ये पूनमने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

विक्रम फडणवीसच्या एका रॅम्प वॉकमध्ये पूनम ढिल्लनचा तोल गेला होता आणि ती पडली होती.

सोनाक्षी सिन्हा - बॉलिवूडमधील ‘दबंग गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाक्षी सिन्हादेखील रॅम्प वॉक करताना धडपडली होती. यावेळी ती उप्स मोमेंटची शिकारही झाली होती.

2010 मध्ये प्राइड बंगळुरूमध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये ती शो स्टॉपर होती. यावेळी तिने फॅशन डिझायनर गोविन सी मिगुएलचा गाऊन परिधान केला होता. या गाऊनची डिझाईन अशी होती की त्यात सोनाक्षीचा पाय अडकला आणि ती पडली.

सोना महापात्रा - बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका तिच्या गाण्यासोबतच स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत येत असते. २०१३ मध्ये सोना एक रॅम्प वॉक करताना पडली होती.

२०१३ मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये सोना शो स्टॉपर होती. पण, रॅम्प वॉक करताना तिचा पाय घसरला आणि ती पडली.

यामी गौतम - २०१८ मध्ये, यामी लॅक्मे फॅशन वीकमध्ये पाय घसरुन पडली होती.

स्टेजवर चालत असताना तिचा तोल गेला आणि ती स्टेजवर पडली.