रामसे ब्रदर्सच्या सिनेमातील सुपरहिट भूत 'सामरी' आता कुठे आहे आणि काय करतोय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:51 IST2022-02-25T18:35:29+5:302022-02-25T18:51:21+5:30
Anirudh Agrawal: सामरी भूताची भूमिका साकारणारे अभिनेते अनिरूद्ध अग्रवाल आपल्या उंचीमुळे आणि आवाजामुळे सहजपणे लोकांना घाबरवू शकत होते. पण गेल्या काही वर्षापासून ते सिनेमातून अचानक गायब झाले आहेत. चला जाणून घेऊ ते आता कुठे आहेत आणि काय करताहेत?

Anirudh Agrawal: ८० आणि ९०च्या दशकात हॉरर सिनेमे करून रामसे ब्रदर्सनी प्रेक्षकांना खूप घाबरवलं. त्यांच्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच त्यांच्या सिनेमातील भूमिकाही घाबरवणाऱ्या होत्या. मग ती वीरानामधील जॅस्मीन असो वा त्यांच्या सिनेमातील भूत सामरी असो. सामरी भूताची भूमिका साकारणारे अभिनेते अनिरूद्ध अग्रवाल आपल्या उंचीमुळे आणि आवाजामुळे सहजपणे लोकांना घाबरवू शकत होते. पण गेल्या काही वर्षापासून ते सिनेमातून अचानक गायब झाले आहेत. चला जाणून घेऊ ते आता कुठे आहेत आणि काय करताहेत?
बॉलिवूडमध्ये काम सुरू करण्याआधी अनिरूद्ध अग्रवाल सिनेमाआधी मुंबईत नोकरी करत होते. त्यांनी IIT रूडकीमधून इंजिनिअरींग केलं आहे. त्यानंतर नोकरी करण्यासाठी ते मुंबईत आले. पण त्यांचं पहिलं प्रेम अभिनय करणं आणि अभिनेता होणं हे होतं. एकदा अनिरूद्ध यांनी आजारी असल्याने सुट्टी घेतली होती. तेव्हा एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना रामसे ब्रदर्सना भेटण्यास सांगितलं. ते गेलेही. हा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.
ते म्हणाले होते की, जेव्हा मी रामसे ब्रदर्सना भेटायला गेलो तेव्हा मला बघताच त्यांनी मला 'पुराना मंदिर' सिनेमाची ऑफर दिली. मी सुद्धा सिनेमा मिळताच नोकरी सोडली. कारण मला अभिनेता व्हायचं होतं आणि माझी आवडीही तिच होती. त्यामुळे मी वेळ न घालवता त्यांची ऑफर स्वीकारली.
अनिरूद्ध यांचा चेहरा-मोहरा, त्यांची उंची रामसे ब्रदर्सना खूप आवडली होती. त्यांची पर्सनॅलिटी रामसेना त्यांच्या सिनेमातील भूतासाठी परफेक्ट वाटत होती. विना मेकअपही अनिरूद्ध विशाल शरीराने घाबरवू शकत होते. याचा उल्लेखही त्यांनी एका मुलाखतीत केला होता.
ते म्हणाले की, त्यावेळी रामसे नव्या अभिनेत्याच्या शोधात होते आणि त्यांना नव्या अभिनेत्यांसोबत काम करणं आवडतं. त्यांनी मला बघताच सिनेमातील भूताचा रोल ऑफर केला. त्यानंतर रामसे यांनी माझ्या चेहऱ्याचा खूप फायदा घेतला. कारण माझा चेहरा त्यांच्या सिनेमात हिट होत होता. अशाप्रकारे मी त्यांच्या सिनेमात भूत झालो.
रामसे ब्रदर्सपैकी श्याम रामसे हे अनिरूद्ध यांच्याबाबत एकदा म्हणाले होते की, हा आमच्या सिनेमातील सुपरहिट भूत आहे. त्यांचा चेहराच असा आहे जो विना मेकअप कुणालाही घाबरवू शकतो. जर ते कुठे गेले तर असं होऊ शकत नाही की लोक त्यांना वळून बघणार नाही.
आता ७२ वर्षांचे झाले आहे अनिरूद्ध. १ डिसेंबर १९४९ मध्ये त्यांचा जन्म देहरादूनमध्ये झाला होता. त्यांनी बंद दरवाज़ा, पुराना मंदिर, बॅंडिट क्वीन, सामरी, आज का अर्जुन, जादूगर, मर मिटेंगे, राम लखन, मेला, तलाश, तुम मेरे हो, बचाओ: इनसाइड भूत है आणि मल्लिका सारख्या सिनेमात काम केलं. २०१० साली आलेला मल्लिका हाच त्यांचा अखेरचा सिनेमा होता. त्यानंतर ते सिनेमात दिसले नाही. यातील त्यांच्या भूमिकेचं नावही सामरी होतं.
ते म्हणाले होते की, 'एकवेळ अशी आली की इंडस्ट्रीने मला बाहेर केलं. रोज कितीतरी लोक येतात आणि संघर्ष करतात. मला सिनेमे मिळत होते, पण ते पुरेसे नव्हते. मलाही पर्मनंट सॅलरीची गरज नव्हती. त्यामुळे मीच सिनेमापासून दूर झालो. मला याचा काहीही पश्चाताप किंवा राग नाही. मला सिनेमे मिळाले असते तर मी अजून काम केलं असतं. मी आता गर्दीत हरवलो होतो'.
अनिरूद्ध यांनी सिनेमांसोबत 'ज़ी हॉरर शो', 'मानो या ना मानो' आणि शक्तिमान सारख्या मालिकेतही काम केलं. बॉलिवूडसोबत त्यांनी हॉलिवूड सिनेमे 'Such a Long Journey' आणि Rudyard Kipling च्या 'The Jungle Book' मध्येही काम केलं. आपल्या उंचीमुळे चालताना त्यांनी आता कंबरदुखी आणि पाठीचा त्रास होतो. त्यामुळे ते सिनेमापासून दूर आहेत. आता ते त्यांच्या बिझनेस सांभाळतात.
अनिरूद्ध यांचा मुलगा असीम अग्रवालने २००६ मध्ये 'फाइट क्लब' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. पण तो आता लॉस एंजलिसमध्ये सेटल झाला आहे. तेच त्यांची मुलगी कपिला अग्रवाल अमिताभ बच्चन यांच्या 'बंटी और बबली'सहीत इतरही काही सिनेमात दिसली. नंतर ती सुद्धा बॉस्टनला गेली आणि तिथे मॉडलिंग व प्रोफेशनल आर्किटेक्ट आहे.