हनिमूननंतर दिसला बॉयफ्रेंड पतीचा खरा चेहरा, अभिनेत्रीसोबत केलं असं काही...; १२ दिवसांतच मोडलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:45 IST2025-06-12T16:38:00+5:302025-06-12T16:45:44+5:30

देशात सोनम-राजा रघुवंशी प्रकरणाची सगळीकडे चर्चा असताना अभिनेत्रीने तिच्या हनिमूनची भयावह आठवण सांगितली आहे.

देशात सोनम-राजा रघुवंशी प्रकरणाची सगळीकडे चर्चा असताना अभिनेत्रीने तिच्या हनिमूनची भयावह आठवण सांगितली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिने २०२० मध्ये बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे याच्याशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर काही वर्षांतच अभिनेत्रीचा घटस्फोट झाला.

पूनम पांडेच्या घटस्फोटाला तिचं लग्नानंतरचं हनिमून कारण ठरलं. पूनमने तिच्या नवऱ्यावर मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.

पूनम पांडे कंगना रणौतच्या लॉकअप शोमध्ये सहभागी झाली होती. तिने या शोमध्ये अनेक खुलासे केले होते.

सॅम माझ्यावर संशय घ्यायचा. तो मला मारायचा. मला फोन वापरायलाही बंदी होती, असं पूनम म्हणाली होती.

लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर सॅमने मारहाण केल्याचंही पूनमने सांगितलं होतं.

एवढचं नव्हे तर हनिमूनला असतानाच तिने नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला तुरुंगाची हवा खायला लावली होती.

लग्नाआधी पूनम आणि सॅम ३ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण, लग्नानंतर १२ दिवसांतच त्यांचा घटस्फोट झाला होता.