सध्या काय करतेय 'सिर्फ तुम'ची अभिनेत्री?, सौंदर्यात ऐश्वर्या रायला द्यायची टक्कर; आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 09:27 AM2023-12-13T09:27:48+5:302023-12-13T09:31:02+5:30

Priya Gill : ९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्या राय आणि प्रिया गिलच्या नावाचा समावेश होता. दोघांनीही आपापल्या करिअरची सुरुवात जवळपास एकाच वेळी केली. त्याचवेळी प्रिया गिल सौंदर्यात ऐश्वर्याला थेट टक्कर द्यायची. मात्र आता ही अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्या राय आणि प्रिया गिलच्या नावाचा समावेश होता. दोघांनीही आपापल्या करिअरची सुरुवात जवळपास एकाच वेळी केली. त्याचवेळी प्रिया गिल सौंदर्यात ऐश्वर्याला थेट टक्कर देत असे, पण एकीकडे ऐश्वर्याचे करिअर उंचावत राहिले, तर दुसरीकडे प्रियाचे करिअर डबघाईस येत राहिले.

प्रिया गिलने १९९५ मध्ये 'फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल'चा किताब जिंकला आणि त्याच वर्षी 'मिस इंटरनॅशनल'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. ती हिंदी चित्रपट तसेच पंजाबी, मल्याळम, तमिळ, भोजपुरी आणि तेलगू चित्रपटांमध्ये प्रत्येकी एका चित्रपटात दिसली, परंतु ती अजूनही १९९९ च्या 'सिर्फ तुम' चित्रपटासाठी ओळखली जाते.

प्रियाने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात १९९६ मध्ये आलेल्या 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत अर्शद वारसी आणि चंद्रचूड सिंग यांसारखे दिग्गज कलाकार होते, परंतु तिचे बॉलिवूड पदार्पण काही खास नव्हते आणि तिचा पहिलाच चित्रपट बॉक्समध्ये फ्लॉप झाला. तसे तर प्रियाचा पहिला चित्रपट चालला नसला तरी तिच्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक झाले.

यादरम्यान प्रियाला 'सिर्फ तुम' हा चित्रपट मिळाला, जो १९९९ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती संजय कपूरसोबत दिसली होती. 'सिर्फ तुम' बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि त्यासोबतच अभिनेत्री प्रिया गिल देशभरात प्रसिद्ध झाली. या चित्रपटानंतर प्रियाला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

'सिर्फ तुम' नंतर ती 'जोश' (२०००) आणि 'रेड' (२००२) सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तिच्या सौंदर्यासाठी तिची ऐश्वर्या रायशी तुलना केली जात होती, पण प्रियाचे चित्रपट काही कमाल दाखवू शकले नाहीत. खूप प्रयत्नांनंतर, तिने २००६ मध्ये स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले, या दरम्यान ती इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील दिसली, परंतु तेथेही तिला यश मिळाले नाही.

शेवटी प्रियाने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या १७ वर्षांपासून ती सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की प्रिया आता देश सोडून डेन्मार्कमध्ये स्थायिक झाली आहे आणि तिचे वैवाहिक जीवन आनंदाने एन्जॉय करत आहे. सतत फ्लॉप ठरल्यानंतरही तिने चित्रपटांपासून दुरावले असले तरीही लोक तिला तिच्या सौंदर्यासाठी ओळखतात.