मुत्राशयाच्या कॅन्सरने निधन, त्याआधी फुप्फुसाचा कर्करोग; विनोद खन्नांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, शेवटी झालेली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:31 IST2026-02-09T10:43:32+5:302026-02-09T11:31:19+5:30

मुत्राशयाच्या कर्करोगाआधी विनोद खन्नांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी केला आहे. कविता यांनी त्यांच्या युट्यूबवरुन शेअर केलेल्या व्हिडीओतून हा विनोद खन्नांच्या कॅन्सरबद्दल खुलासा केला.

विनोद खन्ना हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते होते. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. पण २०१७ मध्ये त्यांचा मूत्राशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. शेवटच्या क्षणी त्यांची फारच वाईट अवस्था झाली होती.

मात्र मुत्राशयाच्या कर्करोगाआधी विनोद खन्नांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी केला आहे. कविता यांनी त्यांच्या युट्यूबवरुन शेअर केलेल्या व्हिडीओतून हा विनोद खन्नांच्या कॅन्सरबद्दल खुलासा केला.

त्या म्हणाल्या, "२००१ मध्ये विनोदला लंग कॅन्सर असल्याचं समजलं. रेग्लुलर चेकअपसाठी गेले असताना विनोदला फुप्फुसाचा कॅन्सरचं निदान झालं होतं. त्याच्या फुप्फुसात पॅच दिसत होते. आम्ही मुंबईच्या टॉप एमआरआय स्पेशालिस्टला दाखवलं होतं. त्यांनीही कॅन्सर असल्याचं सांगितलं".

"तो रोज ४०-८० सिगारेट प्यायचा. फुप्फुसाचा काही भाग काढून टाकल्यानंतर नॉर्मल आयुष्य जगू शकता असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. पण विनोदने ही गोष्ट सांगितली नाही. विनोदने त्यानंतर श्री श्री रविशंकर यांच्याशी संपर्क साधला होता".

"रविशंकर यांनी विनोदला एक महिना थांबून ब्रेथवर्क वर काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर विनोद त्यांच्या आश्रमात गेला होता. तिथे तो दिवसातून तीन वेळा सुदर्शन क्रिया करायचा. त्यानंतर ते दोघे जर्मनीला गेले होते. तिथे रविशंकर यांनी विनोदला एक्सरे करण्याचा सल्ला दिला".

"तेव्हा कळलं की विनोदचा कॅन्सर ठिक झाला आहे. त्याने पंचकर्माची क्रियाही केली होती. २ वर्षांत त्याचा फुप्फुसाचा कॅन्सर बरा झाला होता".

"पण, २०१० मध्ये विनोदला मुत्राशयाचा कॅन्सरचं निदान झालं. तेव्हा मी गुरुशंकर यांना फोन केला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की त्याने दारू पिणं बंद केलं पाहिजे. तो रोज १-२ ग्लास दारू पितो".

"एका वर्षानंतर सगळं काही ठिक आहे असं वाटू लागलं होतं. मात्र नंतर त्यांची तब्येत बिघडत गेली. आणि मुत्राशयाच्या कॅन्सरने त्यांचं निधन झालं".