१०-१५ नाही तर तब्बल 'इतके' किलो वाढवलं वजन, विकी कौशल असा बनला 'छावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:57 IST2025-02-05T12:48:22+5:302025-02-05T12:57:02+5:30

Chhaava Movie : 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. विकी कौशल सध्या सर्वत्र छावा या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अभिनेता विकी कौशल लवकरच 'छावा' चित्रपटात दिसणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.

विकी कौशल अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूरला पोहोचला, जिथे त्याने चित्रपटातील त्याचे पात्र आणि लूकबद्दल अनेक खुलासे केले.

विकी कौशलने सांगितले की, छावामधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या लूकसाठी त्याने २५ किलो वजन वाढवले ​​आहे.

विकी कौशलने 'खम्मा गनी जयपूर' म्हणत पूर्ण उत्साहात त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आणि म्हणाला की, जयपूरला आल्यानंतर मला जो उत्साह वाटतो ते मी सांगू शकत नाही. माझा नवा चित्रपट येतो आणि मी इथे येत नाही हे शक्य नाही.

विकी पुढे म्हणाला की, माझ्या प्रत्येक चित्रपटाचे प्रमोशन जयपूरपासून सुरू होते. आपल्या चित्रपटाविषयी बोलताना विकी कौशलने सांगितले की, या चित्रपटासाठी त्याने ७ महिने आपल्या शरीरावर काम केले आणि २५ किलो वजन वाढवले.

तो म्हणाला, 'जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा मी हे पात्र कसे साकारेन हे समजत नव्हते. चित्रपटात मला हुबेहूब सिंहासारखे दिसायचे आहे, असे माझ्या दिग्दर्शकाने सांगितले. मग हे कसं होणार याची मला खूप काळजी वाटत होती. मी संभाजी महाराजांचे चित्र पाहिले, ते खरोखर सिंहासारखे दिसत होते. ते पाहताच मी म्हणालो की, हे शक्य होणार नाही.

विकी पुढे म्हणाला की मग मी ते आव्हान म्हणून घेतले. ७ महिने सतत माझ्या शरीरावर काम केले आणि शेवटी माझे वजन २५ किलोने वाढले. या चित्रपटाची तयारी चार वर्षांपूर्वी सुरू झाली होती.

विकीने सांगितले की, टीम स्क्रिप्टवर संशोधन करत आहे. स्क्रिप्टलाच सुमारे अडीच वर्षे लागली. माझे शरीर तयार करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी आणि नंतर घोडेस्वारी करण्यासाठी मला ७ महिने लागले. ७ महिने शूटिंग चालले, त्यानंतरच चित्रपट तयार झाला.

मराठा इतिहासाविषयी बोलताना विकी कौशल म्हणाला की, 'मी फक्त महाराष्ट्राचा आहे. मी लहानपणापासून मराठ्यांचा इतिहास वाचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांचे पुत्र संभाजी महाराज हे देखील एक महान योद्धा होते. त्याच्या व्यक्तिरेखेवर काम करणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे, ज्यांनी मिमी, लुका छुपी आणि जरा हटके जरा बचके या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.