वरुण धवनने खास अंदाजात केले गर्लफ्रेंड नताशाला बर्थडे विश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 17:31 IST2020-05-09T17:31:24+5:302020-05-09T17:31:24+5:30

वरुण धवनची गर्लफ्रेंड नताशाचा वाढदिवस असून त्याने खास अंदाजात तिला सोशल मीडियाद्वारे बर्थडे विश केले आहे.

वरुणने नताशा आणि त्याचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वरुण आणि नताशा यांचे कपल वरुणच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

वरुण आणि नताशा यांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते. चित्रपटांच्या स्क्रिनिंगला, फिल्मी पार्टींना नताशा नेहमीच वरुणसोबत उपस्थिती लावते.

वरुण आणि नताशा एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत.

वरुण आणि नताशा लवकरच लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जाते.

सोशल मीडियावर देखील वरुण आणि नताशा नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात.

वरुणचा वाढदिवस देखील काहीच दिवसांपूर्वी होता. त्याने देखील लॉकडाऊनमुळे वाढदिवस घरीच साजरा केला होता.