पंकज त्रिपाठींच्या घरात राहतात दोन पत्नी? गावातून बोलावले मुंबईत, आता म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 05:04 PM2024-01-02T17:04:30+5:302024-01-02T17:10:49+5:30

Pankaj Tripathi: अभिनेते पंकज त्रिपाठी हे आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्याचं श्रेय ते त्यांची पत्नी मृदुला यांना देऊन त्यांचे नेहमी आभार मानत असतात. मात्र पंकज त्रिपाठी यांच्या घरामध्ये दोन पत्नी राहतात आणि त्यांचा खर्च अनेक वर्षांपासून पंकज त्रिपाठी हे करत आहेत. वाचून धक्का बसला ना? मात्र या गोष्टीचा उलगडा पंकज त्रिपाठी यांनीच केला आहे. तर आज आपण पंकज त्रिपाठी यांच्या घरात राहणारी दुसरी पत्नी कोण हे जाणून घेऊयात.

कधी कधी सामान्य दिसणाऱ्या जोडप्याची प्रेमकहाणी ही सुद्धा एखाद्या परिकथेसारखी असते. याचंच उदाहरण आहे ते म्हणजे अभिनेते पंकज त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मृदुला त्रिपाठी. पंकज त्रिपाठी हे आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्याचं श्रेय ते त्यांची पत्नी मृदुला यांना देऊन त्यांचे नेहमी आभार मानत असतात.

मात्र पंकज त्रिपाठी यांच्या घरात दोन पत्नी राहतात. ज्यांचा खर्च अनेक वर्षांपासून ते करत आहेत. वाचून धक्का बसला ना? मात्र या गोष्टीचा उलगडा पंकज त्रिपाठी यांनीच केला आहे. तर आज आपण पंकज त्रिपाठी यांच्या घरात राहणारी दुसरी पत्नी कोण हे जाणून घेऊयात.

पंकज त्रिपाठी यांच्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये त्यांची पत्नी मृदुला त्रिपाठी ही त्यांच्यामागे ढाल बनून उभी राहिली होती. पंकज त्रिपाठी यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर या गोष्टीचा उलगडा केला होता. मात्र या दोन पत्नींचं नेमकं प्रकरण काय? याचा उलगडा आता खुद्द पंकज त्रिपाठी यांनीच केला आहे.

पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या दोन पत्नींबाबत उलगडा केला आहे. त्यांनी सांगितले की, दोन पत्नी म्हणजे एक माझी पत्नी आणि एक तिची पत्नी मी.

पंकज त्रिपाठी म्हणाले की, माझ्या घरामध्ये केवळ माझंच चालत नाही. मी घरात लोकशाहीवादी वातावरण तयार केलेलं आहे. घरात कुठल्या गोष्टीबाबत माझी असहमती असेल आणि पत्नीची इच्छा असेल तर मी सांगतो की करून टाक. मला वाटतं की प्रत्येकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे.

पंकज त्रिपाठी आणि मृदुला यांची पहिली भेट दोघेही दहावीत असताना झाली होती. आपण लव्ह मॅरेज करायचं हे त्यांनी तेव्हाच ठरवले होते. त्यावेळी त्यांची वर्ष दीड वर्षातून एकदा व्हायची. पुढे त्यांनी आपापल्या कुटुंबीयांची समजूक काढून लग्नासाठी राजी केले. त्यानंतर पंकज त्रिपाठी आणि मृदुला यांचा विवाह सोहळा पार पडला होता.