Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:27 IST2025-07-29T16:16:20+5:302025-07-29T16:27:07+5:30
Tripti Dimri : तृप्तीला भावना उघडपणे व्यक्त करता येत नाहीत. ती सर्व काही तिच्या मनात ठेवते.

अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या आगामी 'धडक २' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे, ज्यामध्ये ती एक स्पष्टवक्ती मुलगी 'विधी'ची भूमिका साकारत आहे, जी तिचं प्रेम मिळवण्यासाठी संघर्ष करते.
अभिनेत्रीने सांगितलं की, या भूमिकेचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. तिला खऱ्या आयुष्यात विधीसारखी बनण्याची इच्छा आहे. तृप्ती म्हणाली की, ती खऱ्या आयुष्यात इंट्रोवर्ट आहे.
तृप्तीला तिच्या भावना उघडपणे व्यक्त करता येत नाहीत. ती सर्व काही तिच्या मनात ठेवते. अभिनेत्रीने अनेक गोष्टी पाहिल्या आहेत आणि खूप काही सहन केलं आहे पण कधीही त्यांचा विरोध केला नाही.
तृप्तीने न्यूज१८ ला सांगितलं की, "विधी खरं बोलण्यास कधीही घाबरत नाही. तिच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं कारण ती तुम्हाला सक्षम बनवते."
"मी स्वतः इंट्रोवर्ट आहे. मी खूप काही सहन केलं आहे आणि पाहिलं आहे, पण कधीही आवाज उठवला नाही. मी माझ्या आयुष्यातील ३० वर्षे अनेक गोष्टींबद्दल गप्प राहून घालवली आहेत."
"मला कधीच लोकांना काहीतरी चूक आहे हे सांगण्याची हिंमत झाली नाही. मी शाझियाला (चित्रपटाच्या दिग्दर्शकाला) म्हटलं की, मला विधीसारखं व्हायचं आहे. या चित्रपटाच्या अखेरीस, परिणाम काहीही असोत, मला न घाबरता माझं सत्य सांगण्याची हिंमत यायला हवी."
"आता मी योग्य गोष्टींसाठी उभी राहते. या चित्रपटाने मला स्वतःला अधिक मोकळेपणाने व्यक्त होण्यास मदत केली आहे." शाझिया इक्बाल दिग्दर्शित 'धडक २' १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
तृप्ती डिमरीचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. बॉलिवूडमध्ये ती अत्यंत लोकप्रिय झाली आहे.