'द काश्मीर फाइल्स'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, पहिल्या तीन दिवसांत जमवल्या इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:50 PM2022-03-14T12:50:51+5:302022-03-15T14:13:36+5:30

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं प्रदर्शन केलं आहे.

'द काश्मीर फाइल्स'ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. या सिनेमाला मर्यादीत स्क्रिन्स मिळूनही, पहिल्याच दिवशी 3.55 कोटींचा गल्ला जमावला.

शनिवारी या सिनेमाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत 8 कोटींहून अधिक कमाई केली.

तिसऱ्या दिवशी सिनेमाने नवीन विक्रम केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतरर प्रेक्षकदेखील भावूक झाले आहेत. प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याचे व्हिडीओ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रविवारी या चित्रपटाने 15.10 कोटींची कमाई केली. तीन दिवसांची एकूण कमाई 27.15 कोटींहुन अधिक आहे.

'द काश्मीर फाइल्स' शुक्रवारी 630 स्क्रीन रिलीज झाला होता, परंतु प्रेक्षकांच्या मागणीमुळे आता स्क्रीन आणि शोची संख्या वाढवण्यात आली आहे.

काश्मीर फाइल्समध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि भाषा सुंबली यांच्या भूमिका आहेत. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय या सिनेमात मांडण्यात आला आहे.